Short & easy मजेशीर मराठी उखाणे | Funny / Comedy Marathi Ukhane

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो!

लग्न ठरल्यानंतर किंवा लग्नानंतर मित्रमंडळींना पार्टी तर द्यावीच लागणार! आणि मग तुम्हाला चिडवण्यासाठी खास उखाण्यांचा आग्रहही होणारच!

मग अशा मौजमजेच्या वातावरणात तुम्ही ते नेहमीचे Traditional आणि Serious उखाणे घेणार? अजिबात नाही. अशा वेळी उखाणेही हलके फुलकेच हवेत, सगळ्यांना हसवणारे. हो ना?

म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी १००% हशा पिकवणारे, कार्यक्रम / पार्टीची मजा वाढवणारे धमाल गंमतीदार उखाणे. सर्वांना पोट दुखेपर्यंत हसवा आणि रॉकस्टार बना.

लक्षात ठेवा, हे उखाणे मित्रमंडळी किंवा तुमच्या वयाच्या मनमिळाऊ नातेवाईकांसमोर घेण्यासाठी आहेत. लग्नासारख्या पारंपरिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घेण्यासाठी मुळीच नाहीत.

आणि हो, तुमचा जोडीदार जर खूपच गंभीर स्वभावाचा असेल, तर त्याच्या परवानगीनेच हे उखाणे घ्या बरं का. नाहीतर मस्करीची कुस्करी व्हायची!

हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

___भेटल्यापासून, झालो मी पूर्ण, पोटांच्या तक्रारीसाठी, आजच घ्या कायम चूर्ण

जुन्या भिंतीवर लावलं, नवीन नवीन कॅलेंडर, __रावांचे पोट म्हणजे, भरलेले गॅस सिलेंडर

मोगऱ्याच्या झाडावर, फुलल्या होत्या कळ्या, __रावांचे दात म्हणजे, मोडक्या दरवाज्याच्या फळ्या

विड्याच्या पानात, पावशेर कात, __रावांच्या कमरेत, घातली गाढवाने लाथ

माझं नाव घेताना __करते Blush, Life मधले Tensions सारे, होणार आता Flush

उन्हाळ्यात अंगाला, घाम येतो फार, आंघोळ कर__, नाहीतर लोकं होतील पसार

__व माझी Lovestory एकदम सच्ची, गुलूगुलू करायला, गाठतो आम्ही गच्ची

चांदीच्या करंड्यात, ठेवले हळदी कुंकू, __रावांना पाहताच, कुत्री लागतात भुंकू

लग्नाच्या पंगतीत, उखाणा घेतो खास, हळू खा ___, घशात अडकेल ना घास

शिमला म्हैसूर उटी, म्हणशील तिथे जाऊ, प्रेमाने भरवतो घास ___, बोटं नको चावू