हॅलो फ्रेंड्स!
लग्न ठरलं म्हटल्यावर घरच्यांची लगेचच, “आता उखाणे पाठ करा…नाहीतर लग्नात फजिती होईल हं” अशी अक्षरशः भुणभुण सुरु होते. त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा… लग्न म्हटलं की उखाणे हे आलेच.
आता उखाणे घ्यायला नाही कोण म्हणतंय, पण नेहमीचे तेच तेच typical मराठी उखाणे किती कंटाळवाणे वाटतात हो, सगळ्यांनी वापरून वापरून रंग उडालेल्या कपड्यांसारखे.
सगळ्या समारंभांमध्ये अगदी न चुकता एकदा तरी ऐकले जातातच! हो ना? सगळ्यांनी ऐकलेले आणि सगळ्यांना तोंडपाठ! ना बोलणाऱ्याला मजा वाटते, ना ऐकणाऱ्याला रस.
आणि काही काही तर एवढे traditional की अगदी ‘काकूबाई स्टाईल’ चे किंवा आजी-आजोबांच्या काळातले वाटतात. हो ना ?
अहो बरोबरच आहे तुमचं. नवीन पिढी म्हटल्यावर उखाणेही नवीन नकोत का?
तेच तेच traditional उखाणे ऐकून कंटाळा आलाय? तुम्हालाही तुमच्या लग्नात, किंवा लग्नानंतरच्या समारंभांमध्ये काहीतरी हटके, काहीतरी नवीन, काहीतरी Unique करायचंय? मग सादर आहेत, आजच्या तरुण पिढीच्या Modern Lifestyle शी जुळणारे ताजे ताजे स्मार्ट उखाणे खास तुमच्यासाठीच!
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?
चला तर मग, उखाणे बघूया.
गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू,
__चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू?
सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर,
___आहे, माझ्या Life चा Server
हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू,
___ एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू?
इस्त्री केल्यावर, कॉलर राहते एकदम ताठ,
माझ्या__चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ
Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले,
___ आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले
उखाणा घ्या म्हटलं की, उखाणा काही सुचत नाही,
कोणाकोणाचं नाव घेऊ, माझंच मला कळत नाही
Ukhana ghya mhatla ki, ukhana kahi suchat nahi,
konakonach nav gheu, majhach mala kalat nahi
रोज ___म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस,
मग उखाणा घेताना ___, कशाला गं खोटे खोटे लाजतेस?
Roj ___mhanun, sarkhi navane haak martes,
mag ukhana ghetana ___, kashala g khote khote lajtes?
तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफूल,
__ माझी आहे, खरंच कित्ती ब्युटीफुल!
Tichi ni majhi chemistry, ahe ekdam wonderful,
___majhi ahe, kharach kitti beautiful!
आमच्या दोघांचे स्वभाव, आहेत Complementary,
__ रावांचे नाव घेऊन करते, घरात पटकन Entry
Aamachya doghanche swabhav aahet complementary,
___raavanche naav gheun karate, gharat patkan entry
बटाट्याच्या भाजीत घातला, एकदम Tasty मसाला,
___च नाव माहितेय तरी, मला विचारता कशाला?
Batatyachya bhajit ghatla, ekdam tasty masala,
___ch nav mahitey tari, mala vicharta kashala?