हॅलो फ्रेंड्स!

लग्न ठरलं म्हटल्यावर घरच्यांची लगेचच, “आता उखाणे पाठ करा…नाहीतर लग्नात फजिती होईल हं” अशी अक्षरशः भुणभुण सुरु होते. त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा… लग्न म्हटलं की उखाणे  हे आलेच.

आता उखाणे घ्यायला नाही कोण म्हणतंय, पण नेहमीचे तेच तेच typical मराठी उखाणे किती कंटाळवाणे वाटतात हो, सगळ्यांनी वापरून वापरून रंग उडालेल्या कपड्यांसारखे.

सगळ्या समारंभांमध्ये अगदी न चुकता एकदा तरी ऐकले जातातच! हो ना? सगळ्यांनी ऐकलेले आणि सगळ्यांना तोंडपाठ! ना बोलणाऱ्याला मजा वाटते, ना ऐकणाऱ्याला रस.

आणि काही काही तर एवढे traditional की अगदी ‘काकूबाई स्टाईल’ चे  किंवा आजी-आजोबांच्या काळातले वाटतात. हो ना ?

अहो बरोबरच आहे तुमचं. नवीन पिढी म्हटल्यावर उखाणेही नवीन नकोत का?

तेच तेच traditional उखाणे ऐकून कंटाळा आलाय? तुम्हालाही तुमच्या लग्नात, किंवा लग्नानंतरच्या समारंभांमध्ये काहीतरी हटके, काहीतरी नवीन, काहीतरी Unique करायचंय? मग सादर आहेत, आजच्या तरुण पिढीच्या Modern Lifestyle शी जुळणारे ताजे ताजे स्मार्ट उखाणे खास तुमच्यासाठीच!
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

इंजिनियर ने शोध लावून, बनवली इलेक्ट्रिक स्कुटी, ____आहे माझी, लाखात एक ब्युटी

सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर शिवाय, कंप्युटर काही चालत नाही, ____शिवाय आता, मन अजिबात रमत नाही

____ इंजिनियर बनायला, लागले खूप कष्ट, ____ च नाव घेतो, सर्वांसमोर स्पष्ट

तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला, ____ ने खाल्ला खूपच भाव

संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा, मी घातला पसारा तर, ___ने तो आवरायचा

सगळ्या भाज्यांमध्ये, कार्ले सगळ्यात कडू, ___  चे नातेवाईक पुष्कळ, कोणाकोणाच्या पाया पडू?

उन्हापासून वाचण्यासाठी, लावते मी सनस्क्रीन, ___रावांना आवडते खूप, ___चे आईसक्रीम 

खरं प्रेम शोधता शोधता, झाल्या भरपुर चुका, ___चे नाव घेतो, द्या सगळयाजणी एक एक मुका

पाव शेर रवा, पाव शेर खवा, ___चे नाव घेते, आधी हजार रुपये ठेवा

जरीची साडी नेसलीस की, दिसतेस खूपच सुंदर, करीना , कतरिना राहिल्या मागे,  ___चाच पहिला नंबर