हॅलो फ्रेंड्स!

लग्न ठरलं म्हटल्यावर घरच्यांची लगेचच, “आता उखाणे पाठ करा…नाहीतर लग्नात फजिती होईल हं” अशी अक्षरशः भुणभुण सुरु होते. त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा… लग्न म्हटलं की उखाणे  हे आलेच.

आता उखाणे घ्यायला नाही कोण म्हणतंय, पण नेहमीचे तेच तेच typical मराठी उखाणे किती कंटाळवाणे वाटतात हो, सगळ्यांनी वापरून वापरून रंग उडालेल्या कपड्यांसारखे.

सगळ्या समारंभांमध्ये अगदी न चुकता एकदा तरी ऐकले जातातच! हो ना? सगळ्यांनी ऐकलेले आणि सगळ्यांना तोंडपाठ! ना बोलणाऱ्याला मजा वाटते, ना ऐकणाऱ्याला रस.

आणि काही काही तर एवढे traditional की अगदी ‘काकूबाई स्टाईल’ चे  किंवा आजी-आजोबांच्या काळातले वाटतात. हो ना ?

अहो बरोबरच आहे तुमचं. नवीन पिढी म्हटल्यावर उखाणेही नवीन नकोत का?

तेच तेच traditional उखाणे ऐकून कंटाळा आलाय? तुम्हालाही तुमच्या लग्नात, किंवा लग्नानंतरच्या समारंभांमध्ये काहीतरी हटके, काहीतरी नवीन, काहीतरी Unique करायचंय? मग सादर आहेत, आजच्या तरुण पिढीच्या Modern Lifestyle शी जुळणारे ताजे ताजे स्मार्ट उखाणे खास तुमच्यासाठीच!
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

सर्वांच्या आग्रहाखातर, भरवते पुरी श्रीखंड, ___च्या साठी मी, सोडून चालले आशिया खंड

शिमला म्हैसूर उटी, म्हणशील तिथे जाऊ, प्रेमाने भरवतो घास ___, बोटं नको चावू

हो नाही बोलता बोलता, शेवटी केलं हिने मला पास, ___च नाव घेतो, देऊन ___ चा घास

आजचा दिवस आहे, दोन्ही परिवारांची खास, ___ला भरवते प्रेमाने, ___चा घास

अभिमान नाही विद्येचा, गर्व नाही रुपाचा, ___ला भरवितो घास, वरण-भात-तुपाचा

Exams मध्ये व्हायचो, मी चांगल्या नंबराने पास, __ला भरवतो, __चा घास

पंचपक्वान्नांनी भरले, चांदीचे ताट, __खा लवकर, बघत आहेत सर्व वाट

__च्या दिवशी, मस्त जमली पंगत,  __ला घास भरवून, वाढवतो मी रंगत

अगं अगं __, खिडकीत आला बघ काऊ, घास भरवतो__चा, बोटं नको चाऊ

एक होती चिऊ आणि एक होता काऊ, __ला भरवलं तर, मी काय खाऊ?