नमस्कार मित्रांनो,
बायकोने उखाणा घेतला की ‘राव’ ही पदवी ऐकून मनाला क्षणिक का होईना, खूप बरे वाटते. एकदम मोठा माणूस झाल्यासारखे वाटते. हो ना?

पण मग तुम्हाला कोणी तुमच्या प्रेयसी / बायकोसाठी उखाणा घ्यायला सांगितलं तर तुमची बोबडी का बरं वळते ?

पुरुषांचा आणि उखाण्यांचा बऱ्याचदा ३६ चा आकडा असतो. उखाणे? नको रे बाबा…  किंवा, अरे उखाणे बायकांसाठी असतात. मर्द मराठ्यांसाठी नाहीत…अशा  सबबी पुढे करून नाव घेणं टाळण्यात तर तुम्ही एकदम उस्ताद!

आणि मग प्रेयसी / बायकोने खूपच आग्रह केला तर, “मी तुझ्यासाठी आकाशातून एक वेळ चंद्र-तारे तोडून आणू  शकतो… पण  हे उखाणे घ्यायला मात्र मला नको सांगूस” असे बोलून मोकळे होण्यातही तुम्ही पटाईत.

काय हे! तुमच्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर मस्त गोड हसू फुलवण्यासाठी तुम्ही एवढं पण नाही करू शकत?

आता तुमची सुद्धा काय चूक म्हणा, तुम्हाला उखाणे कसे, लांबलचक नकोत. मोठे जड शब्द तर अजिबातच नकोत. साधे सोपे आणि सुटसुटीत हवेत. पटकन वाचून झटकन पाठ होणारे!

आणि यात चुकीचे तरी काय बरे? आत्ताच्या धावपळीच्या जगात एवढे जड जड उखाणे पाठ करणं म्हणजे दिव्यच! त्यात सुद्धा इंग्लिश माध्यमात शिकलेले असाल, तर अगदी साध्या साध्या उच्चारांपासूनच नाकी नऊ येतात. हो ना?

म्हणूनच आम्ही सादर करत आहोत, खास पुरुषांसाठी पाठ करायला अगदी सोपे, छोटे असे लग्नात तसेच लग्नानंतरही घेता येणारे मस्त मराठी उखाणे.

आता उखाणे न घेण्याच्या सबबींना करा राम राम!
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला, बसतात देवीचे घट, ___करते, सगळी कामे एकदम पटापट

नैवेद्याचे ताट, रांगोळीने खुलले, ___च्या संसारात, भाग्य माझे फुलले

पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने फुले, ___चे नाव घेताना, चेहरा माझा खुले

नटण्या-सजण्यामध्ये, बायका असतात खूपच हौशी, ___चे नाव घेतो, ___च्या दिवशी

लोकलचा प्रवास करतो, फर्स्ट क्लास मध्ये बसून, ___ला पडली भूल, आली प्रेमात फसून

अंगणामध्ये चिमण्या, चिवचिवाट करतात, ___चे हट्ट पुरवताना, माझ्या नाकी नऊ येतात

लाखात एक तिचे हसू, दिसते सुद्धा खूपच ढासू, ___ने बनवले finally, माझ्या आईला तिची सासू

घर असावं नेहमी, Clean and Neat, ___आहे माझी, Simple and Sweet

तिला बघताच 'दिल मे बजी घंटी', ___माझी बबली आणि मी तिचा बंटी

पालकाची भाजी २ दिवस, चिरून ठेवली तर सडते रे, ___ला फिरायला नाही नेले, तर ती लगेच रडते रे