नमस्कार मैत्रिणींनो,
आधीच्या काळात नवऱ्याचं नाव न घेणं, अहो-जाओ करणं, उखाणा घेताना लाजेने चूर होणं हे खूपच सामान्य होतं. तो काळच तसा होता.

पण आत्ताचा काळ वेगळा आहे. बऱ्याच मुलींना वाटेल, ज्याला रोज नावानेच हाक मारतो, त्याचे नाव घेण्यासाठी खास उखाणा घ्यायची काय गरज? लाजणे तर दूरच राहिले. केवळ शास्त्र म्हणून या सगळ्या ‘outdated’ परंपरा पाळत राहायच्या का?

अगदी बरोबर आहे तुमचं. गरज खरंच काहीच नाही. पण तुम्ही उखाण्यांकडे केवळ एक प्रथा म्हणून न बघता वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलत तर?

आता हेच बघा ना… नेहमी एकेरी नाव ऐकण्याची सवय असणाऱ्या नवऱ्याला ‘राव’ ऐकण्याचे भाग्य फक्त उखाण्यामुळेच लाभते. हो ना? मग अधून-मधून त्याला जरा भाव दिला तर त्यात काय बिघडलं?

आणि उखाण्याच्या बहाण्याने मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना तुम्हाला चिडवण्याची आयती संधी मिळते ती वेगळीच. तेवढीच जरा गंमत आणि टाईमपाससुद्धा! वातावरणही जरा हलके-फुलके होते.

म्हणूनच उखाण्यांना एखादी कालबाह्य प्रथा समजून सोडून न देता, नवी फोडणी देऊन अजून रंगतदार बनवूया. काय? पटतंय ना?

चला तर मग बघूया, लग्नात तसेच लग्नानंतरही घेता येतील असे सोपे, सुंदर मस्त मराठी उखाणे.

 
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

पौर्णिमेच्या दिवशी, चंद्र उगवला ढगात, तुमच्या आशीर्वादाच्या छायेत, ___रावांची किर्ती पसरो जगात

सासू-सासऱ्यांनी, डोहाळे जेवण केले माझे झोकात, ____ रावांचे नाव घेते, कार्यक्रम झाला थाटात

काळोखी रात्र संपली, धावत आली उषा, ___च्या सहवासात, प्रीतीची चढली नशा

पेटी वाजे तबला वाजे, मंजुळ वाजे बासरी, ___च्या रूपाने सप्तसुरांना, साथ मिळाली हसरी

सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, ____रावांचे नाव घेते, ____च्या घरात

शेतात राबती, बैलांची जोडी, धनधान्याने भरलेली राहो, ___रावांची माडी

तुमच्या आशीर्वादाने सजला, __चा सोहळा, __रावांचे नाव ऐकायला, गाव झालंय गोळा

मातीत माती, माझ्या गावातली माती, __रावांच्या नावाचे, कुंकू लावले माथी

पांढरेशुभ्र धोतर, केशरी फेटा,__रावांपुढे वाटेल, पहिलवानाही छोटा Pandhare shubhra dhotar, keshari pheta,__ ravanpudhe vatel, pahilwanahi chhota

इंग्लिश मध्ये चंद्राला, म्हणतात ना हो मून, __रावांचं नाव घेते, __ ची सून