Short & easy हिंदू देवी-देवतांचे धार्मिक मराठी उखाणे । Best Marathi Ukhane based on Hindu Religion / Mythology / God-Goddess
नमस्कार!
सादर करत आहोत, खास धार्मिक स्त्री-पुरुषांसाठीचे पुराण व देव-देवतांवर आधारित पारंपारिक मराठी उखाणे
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?
चला तर मग, उखाणे बघूया.
कुबेराच्या भांडारात, हिरे-माणकांच्या राशी,
___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी
अश्विन शुद्ध प्रतिपदेला, बसतात देवीचे घट,
___करते, सगळी कामे एकदम पटापट
पेटलेल्या होमात, दुःख-चिंता सारे जळते,
___रावांचे नाव घेऊन, _____ देवाला ओवाळते
संसाराच्या रथाचे, प्रेम आणि विश्वास सारथी,
_____रावांसोबत करते, मी _____ची आरती
गोपिकांना करते धुंद, कृष्णाची बासरी,
___ रावांचे नाव घेते, ___ (पूजेचे नाव) आहे सासरी
कृष्णाच्या गायींना चरायला, हिरवे-हिरवे कुरण,
___रावांचे नाव घ्यायला, _____पूजेचे कारण
(देवाचे नाव) आशीर्वाद दे, येऊ दे भाग्या भरती,
___रावांच्या उत्कर्षाची, कमान राहू दे चढती!
ज्योत दिव्याची मंद, तेवते देवापाशी,
___ चे नाव घेते, ___ च्या दिवशी.
स्वर्गाच्या नंदनवनात, सुवर्णाच्या केळी,
___रावांचे नाव घेते, ___च्या वेळी
___च्या मंदिराला, सोन्याच्या कळस,
___ राव आहेत, सर्वांपेक्षा सरस