Short & easy हिंदू देवी-देवतांचे धार्मिक मराठी उखाणे । Best Marathi Ukhane based on Hindu Religion / Mythology / God-Goddess
नमस्कार!
सादर करत आहोत, खास धार्मिक स्त्री-पुरुषांसाठीचे पुराण व देव-देवतांवर आधारित पारंपारिक मराठी उखाणे
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?
चला तर मग, उखाणे बघूया.
मराठी भाषा आहे, महाराष्ट्राची अस्मिता,
___राव माझे श्रीराम, आणि मी त्यांची सीता
द्वारकेत कृष्ण, अयोध्येत राम,
___रावांचे चरण, हेच माझे चारही धाम
राधेशिवाय कृष्णाला, उरणार नाही अर्थ,
___शिवाय माझं, जीवनच व्यर्थ
तुळशीची करते पूजा, शंकराची करते आराधना,
___रावांना दीर्घायुष्य लाभो, हीच परमेश्वराला प्रार्थना
कुलस्वामिनीला स्मरून, वंदन करते सर्वांना,
___रावांचे नाव घेते, आर्शीवाद द्या आम्हाला
प्रसंगानुरूप येते, परमेश्वराची आठवण,
___रावांच्या हृदयात, अमृताची साठवण
अर्जुनाच्या रथाचे, श्रीकृष्ण झाले सारथी,
___राव माझे, आहेत फार निस्वार्थी
___च्या देवळात, धुपाचा वास,
___ला भरवतो, ___चा घास
कृष्णाच्या रंगात, राधिका न्हाली,
___रावांना घास भरवताना, खूपच मज्जा आली
भाद्रपद महिन्यात, गणपती बसवितात शाडूचा,
___ला प्रेमाने, घास भरविते लाडूचा