Short & easy हिंदू देवी-देवतांचे धार्मिक मराठी उखाणे । Best Marathi Ukhane based on Hindu Religion / Mythology / God-Goddess
नमस्कार!
सादर करत आहोत, खास धार्मिक स्त्री-पुरुषांसाठीचे पुराण व देव-देवतांवर आधारित पारंपारिक मराठी उखाणे
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?
चला तर मग, उखाणे बघूया.
देवाजवळ करतो, ___ची आरती,
___आहे माझ्या, जीवनरथाची सारथी
गुलाबाचे फूल, मधोमध असते पिवळे,
___राव आहेत, कृष्णा सारखे सावळे
देवळाला खरी शोभा, कळसामुळे येते,
___मुळे माझे, गृहसौख्य दुणावते
कोरा कागद, निळी शाई,
रोज देवळात जाण्याची,___ला असते घाई
कमळात उभी लक्ष्मी, मोरावरती सरस्वती,
___रावांचे नाव घेते, खरी मी भाग्यवती
द्वारकेत श्रीकृष्ण, अयोध्येत राम,
___रावांच्या सेवेमध्ये, मला मिळती चारही धाम
पार्वतीने नवस केला, पती मिळावा भोलेनाथ,
___रावांची मिळो मला, जन्मोजन्मी साथ
अर्जुनाच्या रथाचे, श्रीकृष्ण सारथी,
____रावांचे नाव घेऊन, करते ____ ची आरती
महादेवाच्या डोईवर, चंद्राची कोर,
____रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर
___देवा / देवी, करते मी तुझी भक्ती,
___रावांसोबत राहू दे, तुझ्या आशीर्वादाची शक्ती