Short & easy हिंदू देवी-देवतांचे धार्मिक मराठी उखाणे । Best Marathi Ukhane based on Hindu Religion / Mythology / God-Goddess
नमस्कार!
सादर करत आहोत, खास धार्मिक स्त्री-पुरुषांसाठीचे पुराण व देव-देवतांवर आधारित पारंपारिक मराठी उखाणे
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?
चला तर मग, उखाणे बघूया.
शंकराच्या जटांमध्ये, पवित्र गंगेला स्थान,
____रावांमुळे मिळाला, मला सौभाग्याचा मान
महादेवाची मनोभावे, सेवा करतो नंदी,
____रावांच्या प्रेमामुळेच तर, रंगते माझी मेंदी
__च्या देवळाला, सोन्याचा कळस,
__रावांचे नाव घ्यायला, मला नाही आळस
देवळावर चढवला, कळस सोन्याचा,
__राव म्हणजे, नवरा माझा नवसाचा
अथांग सागरात, संथ चालते होडी,
परमेश्वर सुखी ठेवो, ___नी माझी जोडी
पंढरी आहे, माऊलीचे स्थान,
__रावांना आहे, गावी खूपच मान
दोघांच्या पत्रिकेत, ___गुण जुळले,
___रावांमुळे माझे, आयुष्य फुलले
कोकणच्या माणसांत, हापूस आंब्याची गोडी,
____आणि माझी, लक्ष्मी-नारायणाची जोडी
तीन पानी बेल, तीन पानांचा पळस,
____रावांचे नाव घ्यायला, मला नाही आळस
लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा,
___च्या रुपापुढे, रंभा उर्वशीलाही विसरा