वटपौर्णिमा उखाणे | Vat Purnima Ukhane


वटपौर्णिमा म्हणजे श्रद्धा, जिद्द आणि प्रेमाचा सुंदर सोहळा. वटपौर्णिमेच्या रूपाने सत्यवानासाठी सावित्रीने केलेल्या तपश्चर्येची आठवण आजही स्त्रियांना प्रेरणा देते. या दिवशी मुख्यतः विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी छान पारंपारिक कपडे व अलंकार घालून, सवाष्ण रूपात वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून त्याची पूजा व दिवसभर उपवास करतात.

भारतीय संस्कृतीनुसार वडाचं झाड म्हणजे स्थैर्य, छाया, कौटुंबिक एकता आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. निसर्गाचे संतुलन राखण्यातही वडाचे अनन्यसाधारण महत्व आहे.

औषधी गुणधर्मांनी युक्त असे वडाचे झाड आपल्या दाट आणि मजबूत फांद्यांच्या रूपाने असंख्य कीटक, पक्षी व प्राण्यांना सावली आणि आश्रय देते. तसेच ते मोठ्या प्रमाणात प्राणवायू (ऑक्सिजन) तयार करून हवा शुद्ध राखण्यासही मदत करते. त्याच्या मुळांमुळे मातीची धूप थांबते आणि जमिनीस बळकटी मिळते.

परंतु गेल्या काही वर्षांपासून मात्र विकास व शहरीकरणाच्या नावाखाली वृक्षांची बेहिशोबी कत्तल सुरु आहे. हे कमी होते की काय म्हणून आजकाल पैशाच्या लोभाने वटपौर्णिमेसाठी वडाच्या फांद्या तोडून त्या शहरांमध्ये सर्रास विकताना आणि स्त्रियाही परंपरा व भावना जपण्याच्या नावाखाली अविचाराने त्या विकत घेताना दिसू लागल्या आहेत. इतके सुंदर, दुर्मिळ आणि उपयोगी झाड जपायचे की सणाच्या नावाखाली निर्दयपणे कापायचे? त्याला नक्कीच जपायला हवे. हो ना?

त्यामुळे अशा कोणत्याही नव्या ट्रेंड चे सोयीस्कर अंधानुकरण न करता परिणामांचा विचार करून तसेच आपल्या परंपरेच्या मागील खरा अर्थ समजून मगच कोणतीही कृती करावी ही सर्व गृहिणींना कळकळीची विनंती.

चला तर मग उखाणे बघूया.


वटपौर्णिमा व पतीच्या दीर्घायुष्यासाठी पारंपरिक मराठी उखाणे | Traditional Marathi ukhane for Vat Purnima, offered with prayers for the husband’s longevity

1

वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाला फेरे घालते सात,
__
रावांची लाभो मला, जन्मोजन्मी साथ 

Vatapaurnimechya divshi, vadala phere ghalate saat,
___ravanchi labho mala, janmojanmi sath

2

वटवृक्षामुळे, शोभून दिसतो निसर्ग,
___राव सोबत असताना, धरतीही वाटे स्वर्ग

Vatavrukshamule, shobhun disto nisarg,
___ rav sobat asatana, dharti hi vate swarg

3

तीन वर्षांतून एकदा, येतो अधिकमास,
____
रावांसाठी ठेवला, मी वटपौर्णिमेचा उपवास

Teen varshantun ekda, yeto Adhikmaas,
___ravansathi thevala, me vatpaurnimecha upavaas

4

वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास,
____
रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेसाठी खास

Vatavruksha sangato, Satyawan Savitricha itihas,
___ravanche nav ghete, Vatapaurnimesathi khas

5

वडाची पूजा करून, मागितले दीर्घायुष्याचे दान,
____
रावांसोबत, मी संसार करीन छान

Vadachi pooja karun, magitale dirghayushyache daan,
___ravansobat, mi sansar Karin chhan

6

वडाच्या झाडाला घातल्या, प्रदक्षिणा एकशे आठ,
____
रावांसोबत बांधली, मी जन्मोजन्मीची गाठ 

Vadachya jhadala ghatalya, pradakshina ekshe aath,
___ravansobat bandhali, me janmojanmichi gaath

7

रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य,
____रावांसाठी मागते, देवाकडे दीर्घायुष्य

Ramane Sitesathi, uchalale Shiv-dhanushya,
___ravansathi magate, devakade dirghayushya

8

वटपौर्णिमेला आहे, वडाला खूपच महत्त्व,
____
रावांची वाढत राहो, कीर्ती आणि कर्तृत्व

Vatapaurnimela ahe, vadala khoopach mahattva,
___ravanchi vadhat raho, kirti ani kartrutva

9

पतिव्रता धर्माचा, सावित्री आहे आदर्श,
____
रावांचे नाव घेताना, होतो खूपच हर्ष

Pativrata dharmacha, Savitri ahe adarsh,
___ravanche nav ghetana, hoto khoopach harsh

10

वटपौर्णिमेचे व्रत, निष्ठेने करते,
____
रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते

Vatapaurnimeche vrat, nishthene karate,
___ravansathi me, dirghayushya magte

.

11

पतिव्रता सावित्रीपुढे, हार मानली यमाने,
____
रावांचे नाव घेते, आदर प्रेमाने

Pativrata Savitripudhe, haar manli Yamaane,
___ ravanche nav ghete, aadar va premane

12

वटपौर्णिमेचे व्रत करते, सत्यवान-सावित्रीला स्मरून,
____
रावांसाठी दीर्घायुष्य मागते, वडाला नमस्कार करून

Vatpournimeche vrat karte, Satyavan-Savitri la smarun,
___ ravansathi dirghayushya magte, vadala namaskar karun

13

वटपौर्णिमेला भरते, सुवासिनींची ओटी,
___रावांचे नाव, सदा माझ्या ओठी

Vatpurnimela bharte, suvasininchi oṭi,
___ ravanche nav, sada majhya oṭhi

14

पहिल्या वर्षी वटपूजा, थाटामाटात केली,
रूप पाहून माझे, ___रावांची स्वारी खुश झाली

Pahilya varshi vatpuja, thatamatat keli,
Roop pahun majhe, ___ ravanchi swari khush jhali

15

वटपौर्णिमा आहे, सुवासिनींसाठी मोठा सण,
___रावांनी जिंकले, पहिल्याच भेटीत माझे मन

Vatpournima ahe, suvasininsathi motha san,
___ ravanni jinkle, pahilyach bhetit majhe man

16

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला, गुंडाळतात धागा,
___
रावांनी व्यापली माझ्या, हृदयातील सर्व जागा

Vatapournimela vadachya jhaadala, gundaltat dhaaga,
___Ravanni vyapali mazhya, hrudayatil sarva jaaga

17

वटवृक्षाची पूजा करून, गरजू व्यक्तीला करावे दान,
___
रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान

Vatavrukshachi pooja karun, garaju vyaktila karave daan,
___Ravanche naav ghete, thevun sarvancha maan

18

शिऱ्याचा नैवेद्य, देवापुढे ठेवते,
___
रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते

Shiryacha naivedya, devapudhe thevate,
___Ravansathi mi, dirghayushya maagte

19

सृष्टीने जसे वडाचे झाड, वर्षानुवर्षे जपले,
घट्ट राहो जन्मोजन्मी, ___ राव नाते अपुले

Srushtine jase vadache jhaad, varshanuvarshe japale,
Ghatt raho janmojanmi, ___Rav naate apule

20

वडाची पूजा करते, ठेवूनी निर्मळ मन,
___
रावांचे नाव घेते, आहे वटपौर्णिमेचा सण

Vadachi pooja karte, thevuni nirmal man,
___Ravancha naav ghete, aahe Vatapournimecha san

.

21

वडाला फेऱ्या घालण्यासाठी, जमल्या साऱ्या बायका,
___
रावांचे नाव घेते, सगळ्यांनी नीट ऐका

Vadala ferya ghaalnyaasathi, jamalya saarya bayka,
___Ravancha naav ghete, saglyanni neet aika

22

मराठी संस्कृतीची प्रतिमा, सावित्रीच्या निष्ठेचा दर्पण,
___
रावांसाठी करते मी, माझे जीवन अर्पण

Marathi sanskrutichi pratima, Savitryachya nishthecha darpan,
___Ravansathi karte mi, maajhe jeevan Arpan

23

वडाची करते पूजा, शंकराची करते आराधना,
___
रावांना दीर्घायुष्य लाभो, हीच परमेश्वराला प्रार्थना

Vadachi karte puja, Shankarachi karte aaradhana,
___ ravana dirghayushya labho, hich Parmeshwarala prarthana

24

देवघरात तेवतो, नंदादीप समाधानाचा,
___
रावांचे नाव घेऊन, आशीर्वाद मागते अखंड सौभाग्याचा

Devgharat tevto, nandadeep samadhanacha,
___ravanche nav gheun, ashirvad magate akhand saubhagyacha

25

वडाची पूजा, मनोभावे करते,
___
रावांसाठी, दीर्घायुष्य मागते  

Vadachi pooja, manobhave karte,
___ravansathi, dirghayushya magte


निसर्गप्रेमी व आधुनिक विचारांच्या स्त्रियांसाठी खास वटपौर्णिमा उखाणे | Eco-Friendly and Modern Vat Purnima Ukhane for Today’s Women


1

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी, नका फांद्या तोडू,
____
रावांचे नाव घेते, वेळीच हा वेडेपणा सोडू

Vatpournimechya pujesathi, naka fandyat todu,
___ ravanche nav ghete, velich ha vedepana sodu

2

फांद्या तोडून नका घेऊ, वटवृक्षाचे प्राण,
____
राव म्हणतात झाडं म्हणजे, ऑक्सिजन ची खाण

Fandya todun naka gheu, vatvrukshache pran,
___ rav mhantat zhad mhanje, oxygen chi khan

3

वटवृक्ष म्हणजे, निसर्गाचा अनमोल ठेवा,
___
रावांची मी, आयुष्यभर करेन सेवा

Vatavruksh mhanje, nisargacha anmol theva,
___Ravanchi mi, aayushbhar karen seva

4

पतीच्या दीर्घायुष्यासाठी, नका करू वडाची कत्तल,
____
रावांची शप्पथ, निसर्ग घडवेल तुम्हाला अद्दल

Patichya dirghayushyasaathi, naka karu vadachi kattal,
___ ravanchi shappath, nisarg ghadvel tumhala addal

5

पूजेच्या नावाखाली फांद्या तोडणं, पटत नाही मनाला,
____
रावांच्या दीर्घायुष्यासाठी, मनातच स्मरते वडाला

Pujechya navakhali fandya todne, patat nahi manala,
___ ravanchya dirghayushyasaathi, manat smarte vadala

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!