घरातील सर्वांवरच, अथांग तुमची माया, आयुष्यभर घरच्यांसाठी, ___नी झिजवली काया
घर असावं नेहमी, Clean and Neat, ___आहे माझी, Simple and Sweet
मिळून काम केल्यावर, कामं होतात लवकर, मी चिरते भाजी, आणि __ लावतो कुकर
स्मार्ट Couple करते, कामांची वाटणी, मी करते इडल्या आणि, __वाटतो चटणी
माझ्या Life मध्ये, __भेटली Luckily, कोणी काही बोलले तर, करते माझी वकिली
प्रसंगानुरूप येते, परमेश्वराची आठवण, ___रावांच्या हृदयात, अमृताची साठवण
अर्जुनाच्या रथाचे, श्रीकृष्ण झाले सारथी, ___राव माझे, आहेत फार निस्वार्थी
नव्या नव्या घरात, कोणीही जाईल गांगरून, __चुकली कुठे तर, घ्या जरा सावरून
पायातल्या जोडव्यात, माहेरची स्मृती, ___ रावांच्या स्नेहाने, गेली माझी भीती
सुखी संसाराची करतोय, आम्ही आता सुरुवात, __ वर ठेवा कायम, तुमचा प्रेमळ मायेचा हात