चहा गरम राहावा म्हणून, कपावर ठेवली बशी, __माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी

श्रावण महिना सुरु होताच, सणांची होते लगबग सुरु, ____राव आहेत इतके छान, कौतुक तरी किती करू?

लहान-सहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त,  __आल्यापासून  झालंय, आयुष्य खूपच मस्त!

श्रावणानंतर वाजतगाजत, येतात गौरी गणपती, ___राव आहेत, खूपच प्रेमळ पती

नील नभाच्या तबकात, नक्षत्रांचा हार, ___रावांचा स्वभाव, आहे फारच उदार

प्रेमाच्या टॉनिकने होई, तब्येत लगेच बरी,  __ मुळे कळली मला, जगण्याची जिद्द खरी

नवीन घरामध्ये, मन गेलं गांगरून, __रावांच्या मायेची, शाल घेते पांघरून