चिकनच्या तंगडीला, तंदूरचा स्वाद, ___च्या प्रेमाचा, लागला मला नाद
कांद्याची भजी आणि वेलचीचा चहा, ___ चे घेतो नाव, सर्वांनी नीट पहा
मारी ची बिस्किट्स आणि सोसायटी चा चहा, माझे नाव घेताना ___, किती लाजते पहा
लाल लाल डाळिंब, गोड गोड लागते, ___चे नाव घेताना, छान छान वाटते
गरम गरम ब्रेड वर, वितळते जसे बटर, ___ला पाहताक्षणी, उघडले मनाचे शटर
वाट बघितली कितीतरी दिवस, दाद देईना कसली, पण आज मात्र ___, माझ्या जाळ्यात फसली
लोकलचा प्रवास करतो, फर्स्ट क्लास मध्ये बसून, ___ला पडली भूल, आली प्रेमात फसून
पालकाची भाजी २ दिवस, चिरून ठेवली तर सडते रे, ___ला फिरायला नाही नेले, तर ती लगेच रडते रे
खरं प्रेम शोधता शोधता, झाल्या भरपुर चुका, ___चे नाव घेतो, द्या सगळयाजणी एक एक मुका
__च्या बाईक वर __ दिसतो एकदम फिट, बोलू दे लोकांना, आपण आपले जाऊ डबल सीट