उन्हाळ्यात हवा, गार गार ऊसाचा रस, __चाच विचार, माझ्या मनी रात्रंदिवस
नाशिक मध्ये फेमस, आहे सुला वाइन, ___आहे सुंदर म्हणून, मारतो मी लाइन
माझं नाव घेताना __करते Blush, Life मधले Tensions सारे, होणार आता Flush
कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त, _च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त
बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून, __शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून
सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर, ___आहे, माझ्या Life चा Server
नाते जुने झाले तरी, रंग अजूनही ताजाच आहे, __सोबत असताना, प्रत्येक दिवस मजाच आहे
तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफूल, __ माझी आहे, खरंच कित्ती ब्युटीफुल!