चकोराला असते, चांदण्याची आस, __रावांना देते, __चा घास

___चौपाटीवर बसून, समुद्राची बघायला आवडते लाट, ___आपल्या लग्नाची, खूप बघतोय मी वाट

आकाशात चमकतात, चंद्र आणि तारे, ___रावांसाठी, सोडून आले मी सारे

गुलाबाचे फूल, मोहक आणि ताजे, __च्या येण्याने, भाग्य उजळले माझे

वसंतात दरवळतो, फुलांचा सुवास ___सोबत सुरु केला, मी जीवनाचा प्रवास

___च्या काठावर, सुंदर माझे गाव, ___च्या मेंदीत, लपले माझे नाव

हिरव्यागार मळ्यात, चंद्र दिसती तळ्यात, ___रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधते गळ्यात

मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल, ___रावांचे नाव घेऊन, टाकते मी पहिले पाऊल

गुलाबाच्या झाडाला, फुले येतात दाट, ____रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट

आकाशात शोभून दिसे, चंद्राची कोर, ___रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर