संध्याकाळी घरट्यात, परतती पक्षांचे थवे, ___रावांच्या नावाने, मिळाले जीवन नवे
सुंदर राजहंस, शोभा देतो वनाला, ___रावांचे नाव घेताना, आनंद होतो मनाला
फुलांइतकीच सुंदर दिसते, गुलाबाची कळी, हसल्यावर ___च्या गालावर, दिसते सुंदर खळी
___च्या चौपाटीवर बसून, बघते उंच लाट, ___रावांच्या येण्याची, रोज प्रेमाने बघते वाट
समुद्राचे पाणी, निळे आणि गार गार, जीवनरूपी सिनेमाचे, ___राव सुपरस्टार
वसंत ऋतूत कोकिळा गाते गोड, ___च्या भेटीची, लागते मला ओढ
गुलाबाच्या झाडावर येती, काटे अन फुले, __रावांशी लग्न करताच, झाली २ मुले
वसंतात उमलती, रंगीबेरंगी फुले, ___रावांचे नाव घेतल्यावर, चेहरा माझा खुले
पौर्णिमेच्या रात्री, मंद मंद वाहतो वारा, ___चा मूड मला, आज तरी दिसतोय बरा
___च्या घाटातून जाताना दिसते, मनोहारी दृश्य, मन हरपणारं किती गोड असं, ___ च आहे हास्य