श्रावण मासात, सृष्टी पांघरते हिरवी शाल, ___माहेरी गेली की, होतात माझे हाल

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी, नका फांद्या तोडू, ____रावांचे नाव घेते, वेळीच हा वेडेपणा सोडू

दवबिंदूंनी चमकतो, फुलांचा रंग, सुखी आहे संसारात, __ च्या संग 

उगवला सूर्य, मावळला शशी , ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध, __शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध 

हिरवाईचा शालू नेसून, येतो श्रावण महिना, ____रावच आहेत, माझा खरा दागिना

श्रावण महिन्यात, सृष्टी होते हिरवी, ____रावांची गाते, मी उखाण्यातून थोरवी

श्रावणात येते, सुंदर पर्जन्यधारा, ___रावांचे नाव घेते, ___ आहे घरा

वटपौर्णिमेला आहे, वडाला खूपच महत्त्व, ____रावांची वाढत राहो, कीर्ती आणि कर्तृत्व

बरसला पाऊस, दरवळली माती, __रावांसोबत, फुलली नवीन नाती