श्रावणात आकाशात, कडकडतात विजा, __रावांसोबत करते, __ची पूजा
हिरव्या हिरव्या जंगलात, झाडी घनदाट, __रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट
नील नभाच्या तबकात, नक्षत्रांचा हार, ___रावांचा स्वभाव, आहे फारच उदार
भर श्रावणात, पाऊस आला जोरात, __रावांचे नाव घेते, __च्या घरात
आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा, __ च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा!
श्रावणात बरसल्या, धुंद जलधारा, __रावांमुळे फुलला, संसाराचा फुलोरा
आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे, __ च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे
वटवृक्षामुळे, शोभून दिसतो निसर्ग, ___राव सोबत असताना, धरतीही वाटे स्वर्ग
श्रावणात येई, पावसाला जोर, __राव भेटायला लागते, भाग्य खूपच थोर
निळ्या निळ्या आकाशात, चमचमतात तारे, __ च नाव घेतो, लक्ष द्या सारे