चिकनच्या तंगडीला, तंदूरचा स्वाद, ___च्या प्रेमाचा, लागला मला नाद
कांद्याची भजी आणि वेलचीचा चहा, ___ चे घेतो नाव, सर्वांनी नीट पहा
मारी ची बिस्किट्स आणि सोसायटी चा चहा, माझे नाव घेताना ___, किती लाजते पहा
गरम गरम सांभर मध्ये, MDH चा मसाला, ___चे नाव घेताच, नेहमी येते हसायला
साताऱ्याहून आणला, स्पेशल खवा, ___चा सहवास, मला रोज रोज हवा
दुधाचे केले दही, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा, ___चे नाव घेतो, ___रावांचा पठ्ठा
लाल लाल डाळिंब, गोड गोड लागते, ___चे नाव घेताना, छान छान वाटते
पुरणपोळीवर तूप घालावे, ताजे आणि साजूक, ___राव आहेत आमचे, फार नाजूक
काचेच्या बशीत, बदामाचा हलवा, ___रावांचे नाव घेते, सासूबाईंना बोलवा
गरम गरम ब्रेड वर, वितळते जसे बटर, ___ला पाहताक्षणी, उघडले मनाचे शटर