इंग्रजी भाषेत, चहाला म्हणतात Tea, ___चे नाव घेण्यास, लागते Double fee

दही चक्का तूप, ___आवडते मला खूप

तांदूळ निवडताना, मिळतात खूप खडे, ___रावांना आवडतात, गरमागरम बटाटे वडे

गोड गोड पुरणाच्या पोळीवर, मस्त लागते तूप, सासूबाई तुम्ही रहा निश्चिंत, ___ वर प्रेम करणार मी खूप

वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा, ___रावांसह मला, आपला आशीर्वाद हवा

चांदीच्या ताटात वाढले आहे, भात आणि वरण, ___रावांचे नाव घ्यायला, ___पूजेचे कारण

संसाराच्या करंजीत, प्रेमाचे सारण, _____रावांचे नाव घेते, _____दिवसाचे देऊन कारण

पांढऱ्या शुभ्र भातावर, पिवळं धमक वरण, ___रावांच नाव घेते, _____पूजेचे कारण

आयुष्याच्या करंजीत, प्रेमाचे सारण, ___रावांचे नाव घेते, हळदी कुंकुवाचे कारण