कोल्हापूरचा फेमस आहे, तांबडा पांढरा रस्सा, ___नेहमी म्हणते मला, मांडीवर घेऊन बसा

इडली नको, डोसा नको, नको वडापाव, मला आवडतात फक्त, माझे गोड गोड ___राव

बिर्याणी हवी सारखी, नको वरण भात, __च्या हॉटेल प्रेमाने, पोटाची लागलीये वाट  

पोटभर जेवण झाल्यावर, विसरू नका खायला पान, ___ला पाहिल्यावर, हरवून गेल माझं भान

अभिमान नाही विद्येचा, गर्व नाही रुपाचा, ___ला भरवितो घास, वरण-भात-तुपाचा

रंगांची उधळण करत, आली आता होळी, __ला भरवतो, तिचीच पुरणपोळी

खजूर असतो मऊ, आणि कडक असते खारीक, झाला साखरपुडा ___संगे, आता येऊ दे लवकरच लग्नाची तारीख

डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, ___रावांच्या नावाने, कुंकू लावते लाल

नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड, ____च नाव घेतो, आता तरी वाट सोड

काचेच्या वाटीत, फळे ठेवली कापून, ___रावांचे नाव घेते, सर्वांचा मान राखून