मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय, __ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय  

बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून,  __शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

__ च्या गोळ्या घेऊन, तोंड होते कडू, __इतकी गोड जणू, मऊ बेसनाचा लाडू

सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर, ___आहे, माझ्या Life चा Server

खमंग चिवड्यात घालतात, खोबऱ्याचे काप, __ रावांचे नाव घेऊन, ओलांडते मी माप

प्रेमाला नसते मोजमाप, नसते लांबी रुंदी, आज भरवते__ला, गोड गोड बासुंदी

बटाट्याच्या भाजीत घातला, एकदम Tasty मसाला, ___च नाव माहितेय तरी, मला विचारता कशाला?

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,  ___झाली, आज माझी गृहमंत्री

गरम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव, ___राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव!