दुधाचे केले दही, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा, ___चे नाव घेतो, ___रावांचा पठ्ठा
लाल लाल डाळिंब, गोड गोड लागते, ___चे नाव घेताना, छान छान वाटते
चुलीवर ठेवले दूध, दुधात साय, ___रावांना जन्म देणारी, धन्य ती माय
काकवी पासून, बनवतात गूळ, ___रावांचे नाव घेऊन, वाटते मी तिळगूळ
पालकाची भाजी २ दिवस, चिरून ठेवली तर सडते रे, ___ला फिरायला नाही नेले, तर ती लगेच रडते रे
सगळ्या भाज्यांमध्ये, कार्ले सगळ्यात कडू, ___ चे नातेवाईक पुष्कळ, कोणाकोणाच्या पाया पडू?
अर्जुनाच्या रथाचे, श्रीकृष्ण झाले सारथी, ___राव माझे, आहेत फार निस्वार्थी
गावठी गुलाबाला येतो, अप्रतिम सुवास, ___रावांना भरवते, ___चा घास
घरी बघण्यासाठी आली होती, ___(सासरचे आडनाव)ची स्वारी, ___रावांसोबत करेन आता, पंढरीची वारी
प्रीतीच्या फुलांचा, कसा गंध सांगू, ___राव मिळाले, देवाकडे आणखी काय मागू?