पारिजताकाच्या झाडाखाली, हरीण घेते विसावा, ___रावांच्या पाठीशी, सदैव परमेश्वर असावा

सौभाग्याचे अलंकार, मंगळसूत्राचे काळे मणी, ___राव आहेत, माझ्या कुंकवाचे धनी

सासरी आहे माझ्या, सुंदर हिरवा मळा, ___रावांमुळे लागला, मला त्याचा लळा

शेतात राबती, बैलांची जोडी, धनधान्याने भरलेली राहो, ___रावांची माडी

मातीत माती, माझ्या गावातली माती, __रावांच्या नावाचे, कुंकू लावले माथी

पांढरेशुभ्र धोतर, केशरी फेटा,__रावांपुढे वाटेल, पहिलवानाही छोटा Pandhare shubhra dhotar, keshari pheta,__ ravanpudhe vatel, pahilwanahi chhota

काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार, __ राव शिकलेले आणि मी अडाणी गवार 

गार गार माठामधले, पाणी ताजे ताजे, __राव माझ्या, मनाचे झाले राजे

फुलाचा सुगंध, मातीसही लागे, __रावांशी जुळले, जन्मोजन्मीचे धागे

रसाळ कलिंगडाचे, हिरवे हिरवे साल, ___रावांच्या नावाने, कुंकू लावते लाल