निसर्गाचे सारे रंग, भरलेत तुझ्यात देवाने, ___ घरी आली, लक्ष्मी या रूपाने
श्री कृष्णाचे नाव घेतले, की आठवते लगेच बासरी, ___राणी माझी, आहे एकदम हसरी
पोटभर जेवण झाल्यावर, विसरू नका खायला पान, ___ला पाहिल्यावर, हरवून गेल माझं भान
अभिमान नाही विद्येचा, गर्व नाही रुपाचा, ___ला भरवितो घास, वरण-भात-तुपाचा
माझ्या गुणी __ला, पहा सगळ्यांनी निरखून, जणू कोहिनूर हिरा, आणलाय आम्ही पारखून
मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस, __तू फक्त, मस्त गोड हास
वेरुळची शिल्पे, आहेत अप्रतिम सुंदर, ___आहे माझी, सर्वात सुंदर
जुईची वेणी, जाईचा गजरा, ___वरती, सगळ्यांच्या नजरा
फुलांइतकीच सुंदर दिसते, गुलाबाची कळी, हसल्यावर ___च्या गालावर, दिसते सुंदर खळी
खडीसाखरेचा खडा, खावा तेव्हा गोड, ___च्या रूपात, नाही कुठे खोड