___च्या घाटातून जाताना दिसते, मनोहारी दृश्य, मन हरपणारं किती गोड असं, ___ च आहे हास्य

नाजूक अनारसे, तळले तुपात, काहीतरी जादू आहे, ___च्या रूपात

मनाच्या कप्प्यात, प्रेमाची लेखणी, ___माझी दिसते, सगळ्यात देखणी

लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा, ___च्या रुपापुढे, रंभा उर्वशीलाही विसरा

उंदीर राहतो, ती जागा असते बीळ , घायाळ करतो ___च्या, गालावरचा तीळ

नभांगणी दिसे, शरदाचे चांदणे, ___चे रूप, आहे खूपच देखणे

जाई च्या वेणीला, चांदीची तार, ___माझी म्हणजे, लाखात एक नार

हत्तीच्या अंबारीला, मखमली झूल, ___माझी नाजूक, जसे गुलाबाचे फूल

गालावर खळी, डोळ्यात धुंदी, __मुळे झाले, आयुष्य सुगंधी

चंद्रामुळे येते, विशाल सागराला भरती, __च्या नुसत्या हसण्याने, सारे श्रम माझे हरती