सोन्याच्या कपावर, चांदीची बशी, __समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वशी
डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी, __माझी झाल्यापासून, जळतात बघा सारी
सीतेसारखे चारित्र्य, रंभेसारखे रूप, ___च्या सोबत, मी आनंदी आहे खूप
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, __च्या रूपाने, झालो मी बेभान
माधुरीच्या अदा, कतरीनाचं रूप, __ ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप
ती आली की, पैंजण छुम-छुम वाजते, ____माझी, कित्ती गोड लाजते
लिपस्टिक वाढवते ___ची ब्यूटी, त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी
दिसते इतकी गोड, की नजर तिच्याकडेच वळते, __च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते
गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा, __च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा
इस्त्री केल्यावर, कॉलर राहते एकदम ताठ, माझ्या__चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ