___ला जमली आहेत, माणसे खूप खास, ___ला भरवतो मी, ___चा घास

चांदीच्या ताटाभोवती, रांगोळी काढली मोरांची, ___ रावांच नाव ऐकायला, गर्दी जमली पाहुण्यांची

आजच्या सोहळ्याचा, थाट केलाय खास, __ला भरवतो, __चा घास

जेवणाच्या पंगतीत, उखाणा घेते खास, __रावांना देता देता, __चा घास

चांदीच्या ताटात, पक्वान्नांची रास, __रावांना देते, __चा घास

गणपती बाप्पा आहेत, शंकर-पार्वतीचे सुपुत्र, ___रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र

माहेरी साठवले, मायेचे मोती, __च नाव घेऊन, जोडते नवी नाती

प्रेमरूपी दिव्यात लावते, प्रीतिची वात, ___रावांचे नाव घ्यायला, केली आजपासून सुरुवात

आपला आशीर्वाद,आहे लाख मोलाचा, __रावांसोबत, संसार करेन सुखाचा

वसंतात दरवळतो, फुलांचा सुवास ___सोबत सुरु केला, मी जीवनाचा प्रवास