कपाळाचं कुंकू, जसा सूर्याचा ठसा, ___रावांचे नाव घेते, सारे जण बसा

हातावरची मेंदी देते, आयुष्याला अर्थ नवा, ____रावांचे नाव घेते, सदा तुमचा आशीर्वाद हवा

हातात हिरवा चुडा, गळ्यात शोभते ठुशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

सासरी आले तरी, माहेरचे विसरता येत नाही अंगण, ___रावांचे नाव घेऊन, सोडते मी कंकण

वाट जीवनाची, झाली सुखद आनंदी, ___ रावांच्या सोबत, चालले मी सप्तपदी

लग्न लागले, घातले मंगळसूत्र, ___रावांसोबत, सुरु झाले नवे सत्र

घातली मी वरमाला, हसले ___राव गाली, थरथरला माझा हात, लज्जेने चढली लाली

दशरथ राजाला, पुत्र होते चार, ____रावांनी घातला, मला मंगळसूत्राचा हार

पूजेच्या साहित्यात, उदबत्तीचा पुडा, ____रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा

स्वातंत्र्याच्या होमकुंडात, वीरांनी मारली उडी, ___रावांच्या नावाने, घातली मंगळसूत्राची जोडी