नऊवारी साडीवर, शोभून दिसते ठुशी, ____रावांचे नाव घेते, ____च्या दिवशी

लग्नात घातले, हार आणि तुरे, ____रावांचे नाव घेते, चिडवणं आता पुरे

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,  ___झाली, आज माझी गृहमंत्री

लाल लाल मेंदी, हिरवागार चुडा, __ रावांमुळे पडला जीवनात, प्रेमाचा सडा

सुंदर रांगोळ्यांनी आणली, पंगतीला शोभा, __ला भरवतोय घास, सर्वांनी बघा

कामाची सुरूवात, होते श्रीगणेशापासून, ____चे नाव घ्यायला, सुरूवात केली आजपासून

मंगळसूत्र हाच, सौभाग्याचा दागिना खरा, ____रावांचे नाव घेऊन, जपते मराठी परंपरा