गरम गरम सांभर मध्ये, MDH चा मसाला, ___चे नाव घेताच, नेहमी येते हसायला

पोळीचे नकाशे बनवणं, ही __ची कला, त्यानेही बनवल्या गोल तर, भाव कोण देणार मला?

स्मार्ट Couple करते, कामांची वाटणी, मी करते इडल्या आणि, __वाटतो चटणी

कॅन्टीन, हॉटेलला ठोकला मी राम राम, __च्या हातचं जेवण, आवडते मला जाम

रंगांची उधळण करत, आली आता होळी, __ला भरवतो, तिचीच पुरणपोळी

चटणीला दिला तडका, जिरे-मोहरीचा,  ___राव आहेत जणू, हिरा कोहिनूरचा

चांदीच्या किचन मध्ये, सोन्याचा ओटा, __सोबत असताना, नाही आनंदाला तोटा

बाहेरच्या जेवणाने पोट बिघडून, व्हायचे आधी जागरण,  आता मी खुश, पोटही खुश ___ निघाली सुगरण

गोड गोड पुरणपोळीवर, घ्यावे भरपूर तूप, __वर माझे, प्रेम आहे खूप खूप

ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस, __तू मला, सुपरवूमन वाटतेस