नमस्कार मित्रमंडळींनो,

लग्नाला काही काळ लोटला, की नाव घ्यायचा आग्रह आपसूकच ओसरू लागतो. पण बाळाच्या आगमनाची चाहूल लागताच संपूर्ण घर पुन्हा एकदा प्रसन्नतेने नटते. आणि मग सुरु होते निरनिराळ्या समारंभाची शृंखला.

आधी डोहाळेजेवण, मग बाळाच्या जन्मानंतर बारसे (नामकरण विधी), बाळाचा पहिला वाढदिवस, आणि मग ८ वर्षांचे झाल्यावर मुंज (उपनयन विधी) असे अनेक कार्यक्रम सुरूच राहतात.

आणि असे खास कार्यक्रम आले म्हटल्यावर, उखाणेही आलेच!  म्हणूनच सादर करत आहोत, गरोदर स्त्रियांसाठी डोहाळे जेवणाच्या वेळी घेता येतील असे साजेसे बेस्ट मराठी उखाणे.

 

हे उखाणे कसे घ्याल?

लग्नापासून आतापर्यंत उखाणे घेऊन घेऊन तुम्ही तर उखाणे घेण्यात एकदम तरबेज झाला असाल. त्यामुळे उखाणे कसे घ्यायचे हे नव्याने सांगायची काहीच गरज नाही. हो ना?

तरीही, केवळ शास्त्र म्हणून परत एकदा ऐका. अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

आनंदाचे कारंजे, मनी उडते थुई थुई, ___रावांच्या बाळाची, आता होणार मी आई

डोहाळे जेवणाला सजवली, पाना फुलांची नौका, ___रावांचे नाव घेते, लक्ष देऊन ऐका

जमले सगळी नातीगोती, आमच्या या घरात, ___रावांचे नाव घेते, आनंदाच्या भरात

सासर आहे छान, सासू आहे हौशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

निसर्गरूपी आकाशाला, सूर्यरूपी माळी, ___रावांचे नाव घेते, ___च्या वेळी

गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी.

स्वर्गाच्या नंदनवनात, सुवर्णाच्या केळी, ___रावांचे नाव घेते, ___च्या वेळी

सासू-सासऱ्यांनी, डोहाळे जेवण केले माझे झोकात, ____ रावांचे नाव घेते, कार्यक्रम झाला थाटात

हिरवी नेसली साडी, भरला हिरवा चुडा, ___रावांचे नाव घेऊन, शोधते बर्फी की पेढा

घाट घातला तुम्ही, पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे ___रावांच्या प्रेम झुल्यावर, घेते मी हिंदोळे