साखरपुड्याच्या दिवशी, प्रीती मनी दाटली, लाजत बुजत___रावांना, अंगठी मी घातली
साखरपुडा झाला आज, आता लग्न करू जंगी, ___रावांची साथ लाभो, प्रत्येक वेळ प्रसंगी
___च्या काठावर, सुंदर माझे गाव, ___च्या मेंदीत, लपले माझे नाव
स्थळं आली होती खूप, पण थांबलो होतो तुझ्या होकारासाठी, ___सोबत अखेर जुळल्या, माझ्या रेशीमगाठी
कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त, _च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त
बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून, __शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून
हातात हिरवा चुडा, गळ्यात शोभते ठुशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी
नव्या नवरीला शोभतो, हिरव्या बांगड्यांचा चुडा, ___ व माझा, आज आहे साखरपुडा
संसाराच्या गणिताचे, सुरु झाले पाढे, __च नाव घेऊन, भरवते मी पेढे!
नऊवारी साडीवर, शोभून दिसते ठुशी, ____रावांचे नाव घेते, ____च्या दिवशी