लग्नानंतर गृहप्रवेश करताना या उखाण्यांनी सासरच्या मंडळींवर मस्त इम्प्रेशन पाडा!
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?
चला तर मग, उखाणे बघूया.
निसर्गरूपी आकाशाला, सूर्यरूपी माळी,
___रावांचे नाव घेते, ___च्या वेळी
गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी,
___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी.
एकाच सोसायटीत राहून, झाले आमचे प्रेम,
माझ्या नावापुढे अखेर, ___रावांचे लागले Surname
माहेरची नाती, जणू रेशमाच्या गाठी,
रेशीमबंध सोडून सासरी आले, ___च्या साठी
सुखी संसाराची करतोय, आम्ही आता सुरुवात,
__ वर ठेवा कायम, तुमचा प्रेमळ मायेचा हात
मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल,
___रावांचे नाव घेऊन, टाकते मी पहिले पाऊल
परातीत परात, चांदीची परात,
___ची लेक आली, ___च्या घरात
नव्या दिशा नव्या आशांसह, करते नव्या घरी पदार्पण,
___रावांसाठी करेन, संपूर्ण जीवन अर्पण
मराठीत आहेत, खूप सुंदर सुंदर म्हणी,
___रावांचे नाव घेते, गृहप्रवेशाच्या क्षणी
प्रेमच प्रेम असावे, नको कुणाचा द्वेष,
___रावांच्या सोबतीने, करते गृहप्रवेश