लग्नानंतर गृहप्रवेश करताना या उखाण्यांनी सासरच्या मंडळींवर मस्त इम्प्रेशन पाडा!

हे उखाणे कसे घ्याल?

अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

लग्न झाले, वरात झाली, आले आता दारात, ___राव तुम्ही मला, न्या की उचलून घरात

नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड, ____च नाव घेतो, आता तरी वाट सोड

रस्ता अडवायला, जमल्या सगळ्या बहिणी, ____ला येऊ द्या घरात, आवडली ना तुमची वहिनी?

गुलाबाच्या झाडाला, फुले येतात दाट, ____रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट

रुपेरी सागरावर, चंदेरी लाट, ___ रावांचं नाव घेते, सोडा माझी वाट

मायेने वाढवले, संस्कारांनी घडवले, __चं नाव घ्यायला, __नी अडवले

जमले आहेत सगळे, __च्या दारात, __रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात

नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले, __रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले

नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात, __रावांचे नाव घेते, __च्या दारात

शुभ वेळी शुभ दिनी, आली आमची वरात,  __रावांचे नाव घेते, टाकून पहिले पाऊल घरात