लग्नानंतर गृहप्रवेश करताना या उखाण्यांनी सासरच्या मंडळींवर मस्त इम्प्रेशन पाडा!
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?
चला तर मग, उखाणे बघूया.
सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
____रावांचे नाव घेते, ____च्या घरात
उगवला सूर्य, मावळला शशी ,
___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी
__ची लेक झाली, __ ची सून,
__ च नाव घेते, गृहप्रवेश करून!
___ आहेत प्रेमळ, नाही कोणाचा द्वेष,
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, करते गृहप्रवेश
जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज,
__च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज
माहेर सोडताना, पावलं झाली कष्टी,
__रावांच्या संसारात, करेन सुखाची वृष्टी
खमंग चिवड्यात घालतात, खोबऱ्याचे काप,
__ रावांचे नाव घेऊन, ओलांडते मी माप
हिरव्या हिरव्या जंगलात, झाडी घनदाट,
__रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट
लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल,
__ रावांचे नाव घेते, वाजवून __च्या घराची बेल
उंबरठ्यावरती माप देते, सुखी संसाराची चाहूल,
__च्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल