सासर आहे छान, सासू आहे हौशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

नटण्या-सजण्यामध्ये, बायका असतात खूपच हौशी, ___चे नाव घेतो, ___च्या दिवशी

निसर्गरूपी आकाशाला, सूर्यरूपी माळी, ___रावांचे नाव घेते, ___च्या वेळी

फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी, ___ रावांचे नाव घेते, ___ च्या वेळी

गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी.

ज्योत दिव्याची मंद, तेवते देवापाशी, ___ चे नाव घेते, ___ च्या दिवशी. 

काळ्या साडीवर शोभते, हलव्याची ठुशी, ___रावांचे नाव घेते, संक्रातीच्या दिवशी

संक्रांतीला मी, सौभाग्य अलंकारांनी नटते, ___रावांसोबत प्रेमाने, सर्वांना तिळगूळ वाटते

पैशाच्या श्रीमंतीपेक्षा, मनानी असावे श्रीमंत, ___रावांचे नाव घेते, आज आहे मकर संक्रांत

मकर संक्रांतीच्या निमित्ताने, हळदी कुंकूवाचा घातला घाट, आमच्या ___रावांचा आहे, एकदम राजेशाही थाट