तिळासोबत गुळाचा, गोडवा किती छान, ___रावांचे नाव घेऊन, देते संक्रांतीचे वाण

तिळासारखा स्नेह, गुळासारखी गोडी, ___रावांचे नाव घेते, सुखी राहो आमची जोडी

तिळाचा हलवा, चांदीच्या वाटीत, ___रावांचे प्रेम, हेच माझ्या सुखाचे गुपित

स्वर्गाच्या नंदनवनात, सुवर्णाच्या केळी, ___रावांचे नाव घेते, ___च्या वेळी

फुलांइतकीच मोहक दिसते, गुलाबाची कळी, ___ रावांचे नाव घेते, ___च्या वेळी

हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

विद्येचा नसावा अभिमान, श्रीमंतीचा नसावा गर्व, __ रावांचे नाव घेते, ऐकताय ना सर्व?

उगवला सूर्य, मावळला शशी , ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

___च्या दिवशी दरवळे, वाळ्याचे अत्तर, ___रावांचे नाव घ्यायला, मी नेहमीच तत्पर 

कपाळाचं कुंकू, जसा सूर्याचा ठसा, ___रावांचे नाव घेते, सारे जण बसा