नमस्कार मित्रमंडळींनो,
सडकून भूक लागलेली असताना पंचपक्वान्नांचे ताट समोर आले, की पोटातील कावळे अजूनच जोरजोरात ओरडू लागतात. अहो पण गरीब बिचाऱ्या नवरा-नवरीला सुखाने जेवू कोण देतंय?
लग्न असो व पूजा, पंगतीत जेवताना नवरा-बायकोला उखाणा घेऊन एकमेकांना घास भरवण्याचा आग्रह हा ठरलेलाच. उखाणा घेईपर्यंत सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच. अहो नीट जेवू पण देत नाहीत हो ही मंडळी. बाजूला घोळका करून फिदी फिदी हसत बसतात.
मग अशा वेळी पटकन एखादा उखाणा घेतला, की आपणही पोटपूजेसाठी मोकळे.
म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत, खास घास भरविण्याचे उखाणे.
एक युक्ती सांगू? लग्नात, किंवा पूजेला आधीच कोणती पक्वान्न आहेत हे जाणून घ्या. आणि त्यानुसार तुमचा उखाणा आधीच ठरवून ठेवा.
आणि जर जेवणात काय असणार आहे हे आधी माहित नसेल तर? अहो काळजी करू नका.
काही काही उखाणे तर सर्व पदार्थांना चालतील असे आहेत. त्यातले तुमच्या आवडीचे १-२ उखाणे पाठ करा. म्हणजे मग श्रीखंड असो वा बासुंदी, भात असो व भाजी, तुम्ही नेहमीच उखाणा घेण्यासाठी ‘Ready ‘ राहाल. आहे ना एकदम भारी?
हे उखाणे कसे घ्याल?
स्त्रिया आणि पुरुष, असे दोघेही हे उखाणे कोणत्याही शुभकार्याच्या दिवशी घेऊ शकतात.
उखाणे घेणं अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?
आणि हो, जर तुम्हाला एखाद्या उखाण्यामध्ये दोन रिकाम्या जागा दिसल्या, तर गोंधळून जाऊ नका. अशा वेळी एका जागी तुमच्या जोडीदाराचे, तर दुसऱ्या जागी तुम्ही भरवत असलेल्या पदार्थाचे नाव येईल, जसे… बासुंदी / लाडू वगैरे.
फक्त एकदा उखाणा नीट वाचून जोडीदाराचं नाव कुठे येईल आणि पदार्थाचं नाव कुठे येईल हे नक्की बघा. नाहीतर बासुंदीशी लग्न व्हायचे आणि भरवला जायचा नवऱ्याचा घास. बापरे!
जमेल ना? अहो नक्की जमेल. चला तर मग, उखाणे बघूया.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- Go to the next page