स्वर्गाच्या नंदनवनात, सुवर्णाच्या केळी,
___रावांचे नाव घेते, ___च्या वेळी
Swargachya nandanvanat, Suvarnachya keli,
___ravanche nav ghete, ___chya veli
मोत्याचा हार, गौराईच्या गळ्यात,
___रावांचे नाव घेते, सुवासिनींच्या मेळ्यात
अधिकमासात आईने दिली, चांदीची कळशी,
___रावांचे नाव घेते, ___पूजेच्या दिवशी
विवेकानंदांचे स्मारक, कन्याकुमारीच्या सीमेवर,
___रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळेवर
पूजेकरिता जमविल्या, नानविध पत्री,
___रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या रात्री
लग्नानंतर पहिली मंगळागौर, साजरी करते प्रेमाने,
___रावांचे नाव घेते, फुगडी घालून जोमाने
हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी,
___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी
हिरव्यागार रंगाने, श्रावणात सुष्टी सजली,
___रावांच्या नावाने, मी मंगळागौर पुजली