श्रावणातल्या मंगळवारी, पूजते मंगळागौर, ____रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर
पूजते मंगळागौरीला, खेळ खेळते नवे नवे, ____राव पती म्हणून, जन्मोजन्मी हवे हवे!
श्रावणात येते, सुंदर पर्जन्यधारा, ___रावांचे नाव घेते, ___ आहे घरा
हातात हिरवा चुडा, गळ्यात शोभते ठुशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी
श्रावणात आकाशात, कडकडतात विजा, __रावांसोबत करते, __ची पूजा
___ची पूजा, मनोभावे करते, ___रावांसाठी, दीर्घायुष्य मागते
नऊवारी साडीवर, शोभून दिसते ठुशी, ____रावांचे नाव घेते, ____च्या दिवशी
मोत्यांची माळ, सोन्याचा साज, ___ रावांचे नाव घेते, ___ आहे आज
मंगळागौरीच्या दिनी जमला, मैत्रिणींचा मेळा, ___रावांचे नाव घेतले, आता मनसोक्त खेळा
सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी