नमस्कार मित्रमंडळींनो,

नवीन नवीन लग्न झाल्यानंतर मुलींसाठी अवघे विश्वच बदलते. नवे घर, नवी नाती आणि नवी हळवी प्रीती. अशा वेळी नव्या वातावरणाशी जुळवून घेताना एका बाजूला माहेरची ओढ, तर दुसऱ्या बाजूला फुलणाऱ्या नात्यांचा ओहोळ.

पण प्रेमळ जोडीदाराची साथ असेल, तर सर्व काही सोपे होऊन जाते. म्हणूनच आम्ही सादर करत आहोत, नव्या लग्नाची नवलाई सांगणारे खास मराठी उखाणे.

हे उखाणे कसे घ्याल?

अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

पायातल्या जोडव्यात, माहेरची स्मृती, ___ रावांच्या स्नेहाने, गेली माझी भीती

माहेरची नाती, जणू रेशमाच्या गाठी, रेशीमबंध सोडून सासरी आले, ___च्या साठी

जीवनाच्या सागरात, सप्तरंगी पूल प्रेमाचा, ___रावांच्या साथीने, संसार करीन सुखाचा

संध्याकाळी घरट्यात, परतती पक्षांचे थवे, ___रावांच्या नावाने, मिळाले जीवन नवे

सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, ____रावांचे नाव घेते, ____च्या घरात

सोन्याची बरणी, भरली तुपाने, सुख आले घरात, ___च्या रूपाने

किल्ले रायगडाचे, पूर्वीचे नाव होते रायरी, ___ रावांसोबत चढते, सुखी संसाराची पायरी

हिंदवी स्वराज्य स्थापन केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी, ___ आणि माझ्या संसाराची सुरुवात, करतो तुमच्या आशीर्वादांनी

डाळीत डाळ, तुरीची डाळ, ___च्या मांडीवर खेळवीन, एका वर्षात बाळ

मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध, __शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध