नमस्कार मित्रमंडळींनो,

नवीन नवीन लग्न झाल्यानंतर मुलींसाठी अवघे विश्वच बदलते. नवे घर, नवी नाती आणि नवी हळवी प्रीती. अशा वेळी नव्या वातावरणाशी जुळवून घेताना एका बाजूला माहेरची ओढ, तर दुसऱ्या बाजूला फुलणाऱ्या नात्यांचा ओहोळ.

पण प्रेमळ जोडीदाराची साथ असेल, तर सर्व काही सोपे होऊन जाते. म्हणूनच आम्ही सादर करत आहोत, नव्या लग्नाची नवलाई सांगणारे खास मराठी उखाणे.

हे उखाणे कसे घ्याल?

अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची __च नाव घेते, सून मी __ची

लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा , तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?

माहेरच्या आठवणीने, डोळे झाले ओले, __रावांच्या प्रेमाने, अश्रूंची झाली फुले

हातावरची मेंदी देते, आयुष्याला अर्थ नवा, ____रावांचे नाव घेते, सदा तुमचा आशीर्वाद हवा

चांदीची जोडवी, सौभाग्याची खूण, ___रावांचे नाव घेते, ___ची सून 

बरसला पाऊस, दरवळली माती, __रावांसोबत, फुलली नवीन नाती 

सासरी आले तरी, माहेरचे विसरता येत नाही अंगण, ___रावांचे नाव घेऊन, सोडते मी कंकण

माहेर सोडताना, पावलं झाली कष्टी, __रावांच्या संसारात, करेन सुखाची वृष्टी  

नव्या नव्या संसाराचा, नाजूक-गोड अनुभवही नवा, __राव व माझ्या संसाराला, तुमचा अखंड आशीर्वाद हवा 

वडाची पूजा करून, मागितले दीर्घायुष्याचे दान, ____रावांसोबत, मी संसार करीन छान