नमस्कार मित्रमंडळींनो,

नवीन नवीन लग्न झाल्यानंतर मुलींसाठी अवघे विश्वच बदलते. नवे घर, नवी नाती आणि नवी हळवी प्रीती. अशा वेळी नव्या वातावरणाशी जुळवून घेताना एका बाजूला माहेरची ओढ, तर दुसऱ्या बाजूला फुलणाऱ्या नात्यांचा ओहोळ.

पण प्रेमळ जोडीदाराची साथ असेल, तर सर्व काही सोपे होऊन जाते. म्हणूनच आम्ही सादर करत आहोत, नव्या लग्नाची नवलाई सांगणारे खास मराठी उखाणे.

हे उखाणे कसे घ्याल?

अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

नवे घर, नवे लोक, नवी नवी नाती, संसार होईल मस्त, __राव असता सोबती

नव्या नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी, __माझा राजा आणि मी त्याची राणी

संसाररुपी पुस्तकाचे, उघडले पहिले पान, __ रावांचे नाव घेते सर्वांचा राखून मान

लाल लाल मेंदी, हिरवागार चुडा, __ रावांमुळे पडला जीवनात, प्रेमाचा सडा

नवीन घरामध्ये, मन गेलं गांगरून, __रावांच्या मायेची, शाल घेते पांघरून

प्रपोझ केलं देऊन, गुलाबाची फुलं, ___शी लग्न झालंय पण, एवढ्यात नाही हा मुलं!