कृष्णाच्या गायींना चरायला, हिरवे-हिरवे कुरण, ___रावांचे नाव घ्यायला, _____पूजेचे कारण

फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी, ___ रावांचे नाव घेते, ___ च्या वेळी

गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी.

मोगऱ्याचा सुगंध, स्पर्धा करतो निशिगंधाशी, ___ चे नाव घेते, ___च्या दिवशी

पूजेला नटण्यासाठी, बायका असतात खूपच हौशी, _____ रावांचे नाव घेते, ___पूजेच्या दिवशी

ज्योत दिव्याची मंद, तेवते देवापाशी, ___ चे नाव घेते, ___ च्या दिवशी. 

‘नांदा सौख्यभरे’ दिला सर्वांनी आशीर्वाद, ___चे नाव घेते, द्या _____ (पूजेचे नाव) चा प्रसाद!

स्वर्गाच्या नंदनवनात, सुवर्णाच्या केळी, ___रावांचे नाव घेते, ___च्या वेळी

फुलांइतकीच मोहक दिसते, गुलाबाची कळी, ___ रावांचे नाव घेते, ___च्या वेळी

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी