___ला जमली आहेत, माणसे खूप खास, ___ला भरवतो मी, ___चा घास

चांदीच्या ताटाभोवती, रांगोळी काढली मोरांची, ___ रावांच नाव ऐकायला, गर्दी जमली पाहुण्यांची

अर्जुनाच्या रथाचे, श्रीकृष्ण सारथी, ____रावांचे नाव घेऊन, करते ____ ची आरती

अधिकमासात आईने दिली, चांदीची कळशी, ___रावांचे नाव घेते, ___पूजेच्या दिवशी

देवापुढे लावली, समईची जोडी, ___रावांमुळे आली, आयुष्याला गोडी

हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

___च्या दिवशी, दारावर बांधले तोरण, ___रावांचे नाव घ्यायला, कशाला हवे कारण?

उगवला सूर्य, मावळला शशी , ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची __च नाव घेते, सून मी __ची

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, __च्या रूपाने, झालो मी बेभान