वटपौर्णिमा आहे, सुवासिनींसाठी मोठा सण, ___रावांनी जिंकले, पहिल्याच भेटीत माझे मन

तुळशीची करते पूजा, शंकराची करते आराधना, ___रावांना दीर्घायुष्य लाभो, हीच परमेश्वराला प्रार्थना

पहिल्या वर्षी वटपूजा, थाटामाटात केली, रूप पाहून माझे, ___रावांची स्वारी खुश झाली

ते उडवतात पतंग, आणि मी पकडते फिरकी, ___रावांच्या मागे सात जन्म, अशीच घेईन मी गिरकी

सोन्याच्या ताटात, खडीसाखरेची वाटी, ___रावांची लाभो साथ, सात जन्मांसाठी

जीवनरूपी काव्य, दोघांनी मिळून वाचावे, ___रावांच्या प्रेमाचे भाग्य, मला जन्मोजन्मी लाभावे

वटपौर्णिमेला भरते, सुवासिनींची ओटी, ___रावांचे नाव, सदा माझ्या ओठी

कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती, ___राव माझे पती, भाग्य माझे थोर किती!

शिवरायांच्या माथ्यावर, भवानी मातेचा हात, ___रावांची आणि माझी, साताजन्माची साथ

गनिमांवर केली शिवरायांनी, पराक्रमाने मात, ___रावांच्या प्रेमाची, मिळो जन्मोजन्मी साथ