गुलाबाच्या फुलांपेक्षा, नाजूक दिसते शेवंती, __रावांना मिळो दीर्घायुष्य, हीच देवाला विनंती

पूजेच्या नावाखाली फांद्या तोडणं, पटत नाही मनाला, ____रावांच्या दीर्घायुष्यासाठी, मनातच स्मरते वडाला

पतीच्या दीर्घायुष्यासाठी, नका करू वडाची कत्तल, ____रावांची शप्पथ, निसर्ग घडवेल तुम्हाला अद्दल

फांद्या तोडून नका घेऊ, वटवृक्षाचे प्राण, ____राव म्हणतात झाडं म्हणजे, ऑक्सिजन ची खाण

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी, नका फांद्या तोडू, ____रावांचे नाव घेते, वेळीच हा वेडेपणा सोडू

देवघरात तेवतो, नंदादीप समाधानाचा, ___ रावांचे नाव घेऊन, आशीर्वाद मागते अखंड सौभाग्याचा

वटपौर्णिमेचे व्रत करते, सत्यवान-सावित्रीला स्मरून, ____रावांसाठी दीर्घायुष्य मागते, वडाला नमस्कार करून

पतिव्रता सावित्रीपुढे, हार मानली यमाने, ____रावांचे नाव घेते, आदर व प्रेमाने

वटपौर्णिमेचे व्रत, निष्ठेने करते, ____रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते

शिवनेरी किल्ल्यावर झाला, शिवरायांचा जन्म, ___रावच पती मिळावेत, मला सातही जन्म