अश्विन शुद्ध प्रतिपदेला, बसतात देवीचे घट, ___करते, सगळी कामे एकदम पटापट

तांदुळाला इंग्लिशमध्ये, म्हणतात Rice, ___राव आहेत, माझी पहिली Choice

संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा, मी घातला पसारा तर, ___ने तो आवरायचा

कॅन्टीन, हॉटेलला ठोकला मी राम राम, __च्या हातचं जेवण, आवडते मला जाम

काचेच्या ग्लासात, गुलाबी सरबत, ___राव गेले कामाला, की मला नाही करमत

कपाळावर लावले, कुंकू लाल लाल, ___च्या जीवावर, आहे मी मालामाल

रंगांची उधळण करत, आली आता होळी, __ला भरवतो, तिचीच पुरणपोळी

लक्ष्मी शोभते दानाने, विद्या शोभते विनयाने, ___रावांच्या जीवावर, मी राहते मानाने

देवळाला खरी शोभा, कळसामुळे येते, ___मुळे माझे, गृहसौख्य दुणावते

___च्या चौपाटीवर बसून, बघते उंच लाट, ___रावांच्या येण्याची, रोज प्रेमाने बघते वाट